The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

अमृता फडणवीस यांच्या हस्ते १०० विद्यार्थिनींना सायकल वाटप.

News Image

आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून गजानन निवासस्थानी उपक्रम.

चंद्रपूर : महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या प्राचीन शिवलिंगाच्या जीर्णोद्धार कार्यक्रमासाठी चंद्रपूर दौऱ्यावर आलेल्या अमृता देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १०० शाळकरी विद्यार्थिनींना सायकलींचे वितरण करण्यात आले. आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून गजानन निवासस्थानी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनींचा प्रवास सुलभ व्हावा तसेच आर्थिक परिस्थितीमुळे त्यांच्या शिक्षणात अडथळे निर्माण होऊ नयेत, या उद्देशाने हा सायकल वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. सायकली मिळाल्यानंतर विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला.

यावेळी अमृता फडणवीस यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधत शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. मुलींनी शिक्षणाला प्राधान्य देत आत्मविश्वासाने पुढे जावे आणि आपल्या ध्येयाचा पाठपुरावा करावा, असे आवाहन त्यांनी केले.

आमदार किशोर जोरगेवार म्हणाले, “चंद्रपूरच्या मुलींमध्ये गुणवत्ता आणि क्षमता आहे. मात्र, अनेक विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी प्रवासाच्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांचा शाळेपर्यंतचा प्रवास सुलभ व्हावा आणि शिक्षणाची वाट अधिक सोपी व्हावी, यासाठी सायकल वाटपाचा उपक्रम हाती घेतला आहे. मुली शिकल्या तर कुटुंब आणि समाजाची प्रगती निश्चित होते. चंद्रपूरमधील प्रत्येक मुलीला शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू.”

कार्यक्रमाला कल्याणी किशोर जोरगेवार यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थिनी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

नोंद : सदर बातमी आमदार किशोर जोरगेवार यांच्या चंद्रपूर येथील कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार प्रसिद्ध करण्यात आली आहे.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
×
ब्रेकिंग न्यूज़
🔔आठ वर्षा पासून फरार पाहिजे असलेला आरोपी स्था.गु.शा. चंद्रपूर च्या ताब्यात.🔔आमदार किशोर जोरगेवार सपत्नीक पालखी सोहळ्यात सहभागी; एकविरा माता मंदिरातून निघालेल्या पालखीने श्री माता महाकाली  महोत्सवाचा शुभारंभ.🔔संविधान वाचविण्यासाठी काँग्रेसला बळ द्या : सिरिवेल्ला प्रसाद.🔔विद्यार्थ्यांची आवेदनपत्र भरण्याच्या वेळापत्रकाला मुदतवाढ.🔔22 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान राज्यभरात ‘खेत बचाओ अभियान’.🔔दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांना सर्वोच्च प्राधान्य द्या. जिल्हाधिका-यांच्या यंत्रणांना सुचना.🔔अभिजित वंजारी यांच्या विजयासाठी काँग्रेस एकवटली!🔔जिल्ह्यातील 50 ग्रामपंचायतींमध्ये ‘स्वस्तिक पद्धतीने वृक्ष लागवड’ मोहिमेचा शुभारंभ.