The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

रमाई बुद्ध विहार, इंदिरा नगर येथे प्रबोधन कार्यक्रम संपन्न.

News Image

चंद्रपूर : रमाई बुद्ध विहार, इंदिरा नगर येथे सामाजिक व संघटनात्मक विषयांवर आधारित प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात विविध सामाजिक विषयांवर चर्चा करण्यात आली तसेच उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी चंद्रपूर दीक्षाभूमी येथे दि. १५ व १६ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या वर्षावास कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली. तसेच आगामी काळातील विविध कार्यक्रम व सामाजिक उपक्रमांचे नियोजन, कार्यकर्त्यांची भूमिका आणि संघटनात्मक समन्वय याबाबत विचारविनिमय करण्यात आला.

कार्यक्रमाचे आयोजन सुमेध वाघमारे, BSP सेक्टर अध्यक्ष, इंदिरा नगर यांच्या वतीने करण्यात आले.

कार्यक्रमास इंजि. विमित कोसे – शहर अध्यक्ष, बहुजन समाज पार्टी, चंद्रपूर; दादाजी धाकडे – शहर संघटक; अखिल निंबगडे – शहर सदस्य तथा युवा प्रचारक; किशोरजी चिकाटे – बाबूपेठ व भिवापूर झोन प्रभारी; तसेच कामडे साहेब – ज्येष्ठ कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.

यावेळी उपस्थितांनी विविध सामाजिक व संघटनात्मक विषयांवर आपले विचार मांडले. आगामी कार्यक्रमांचे नियोजन, सामाजिक उपक्रम आणि संघटनात्मक कार्य अधिक प्रभावी करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रम शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

आयोजक : सुमेध वाघमारे

BSP सेक्टर अध्यक्ष, इंदिरा नगर, चंद्रपूर.

 

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
×
ब्रेकिंग न्यूज़
🔔आठ वर्षा पासून फरार पाहिजे असलेला आरोपी स्था.गु.शा. चंद्रपूर च्या ताब्यात.🔔आमदार किशोर जोरगेवार सपत्नीक पालखी सोहळ्यात सहभागी; एकविरा माता मंदिरातून निघालेल्या पालखीने श्री माता महाकाली  महोत्सवाचा शुभारंभ.🔔संविधान वाचविण्यासाठी काँग्रेसला बळ द्या : सिरिवेल्ला प्रसाद.🔔विद्यार्थ्यांची आवेदनपत्र भरण्याच्या वेळापत्रकाला मुदतवाढ.🔔22 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान राज्यभरात ‘खेत बचाओ अभियान’.🔔दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांना सर्वोच्च प्राधान्य द्या. जिल्हाधिका-यांच्या यंत्रणांना सुचना.🔔अभिजित वंजारी यांच्या विजयासाठी काँग्रेस एकवटली!🔔जिल्ह्यातील 50 ग्रामपंचायतींमध्ये ‘स्वस्तिक पद्धतीने वृक्ष लागवड’ मोहिमेचा शुभारंभ.