The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

चंद्रपूरच्या वाहतूक कोंडीवर रिंगरोड च्या माध्यमातून कायमस्वरूपी उपाय करा - आमदार किशोर जोरगेवार.

News Image

अधिवेशनात आमदार किशोर जोरगेवार यांची मागणी.

मुंबई : चंद्रपूर शहरातील दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक कोंडी, अपघातांची वाढती संख्या आणि नागरिकांना होणारा मनस्ताप लक्षात घेता पडोली फाटा ते शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय दरम्यान स्वतंत्र रिंगरोड (बायपास) मार्गाची तातडीने निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्द्याद्वारे शासनाकडे केली.

यावेळी सभागृहात बोलताना ते म्हणाले की, चंद्रपूर जिल्हा हा कोळसा, सिमेंट, वनसंपदा आणि विविध उद्योगांमुळे राज्यातील महत्त्वाचा औद्योगिक जिल्हा आहे. मात्र, शहरातून जाणाऱ्या दोन प्रमुख राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा स्वतंत्र पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने संपूर्ण जड वाहतूक चंद्रपूर शहराच्या मध्यवर्ती भागातूनच जात आहे.

त्यांनी सांगितले की, बाबूपेठ, बंगाली कॅम्प, रामनगर, वरोरा नाका आणि पडोली या मार्गांवर दिवसेंदिवस वाहनांचा प्रचंड ताण वाढत असून वाहतूक कोंडी ही गंभीर समस्या बनली आहे. या मार्गांवर वारंवार अपघात घडत असून अनेकांना जीव गमवावा लागत आहे. वाहतूक कोंडीमुळे नागरिक, विद्यार्थी, रुग्णवाहिका, व्यापारी तसेच प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागत आहे.

चंद्रपूर शहराला या समस्येतून कायमस्वरूपी दिलासा देण्यासाठी पडोली फाटा ते शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय दरम्यान स्वतंत्र रिंगरोड (बायपास) उभारणे हा एकमेव प्रभावी पर्याय असल्याचे आमदार जोरगेवार यांनी सभागृहात सांगितले. या संदर्भात सातत्याने मागणी करूनही शासनाकडून अद्याप कोणतीही ठोस आणि निर्णायक कारवाई झालेली नसल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आणि असंतोष निर्माण झाल्याचे त्यांनी यावेळी सरकारच्या निदर्शनास आणून दिले.

शासनाने या प्रस्तावाला प्राधान्य देत आवश्यक निधी उपलब्ध करून लवकरात लवकर स्वतंत्र रिंगरोडच्या कामाला मंजुरी द्यावी, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे केली. चंद्रपूरच्या भविष्यातील वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असून यामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यासोबतच अपघातांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात घटेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
ब्रेकिंग न्यूज़
🔔आमदर सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूरला शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयाची मंजुरी.🔔चंद्रपूरच्या वाहतूक कोंडीवर रिंगरोड च्या माध्यमातून कायमस्वरूपी उपाय करा - आमदार किशोर जोरगेवार.🔔पीएम श्री शहीद भगतसिंग प्राथमिक तथा उच्च प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव.🔔मोठी स्वप्ने पाहा; ज्ञान, जिद्द आणि कर्तृत्वाच्या बळावर महाराष्ट्राचा गौरव वाढवा! – आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔मोरवा येथील चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमावर कठोरात कठोर कारवाई करा!🔔छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही, तर स्वाभिमान, राष्ट्रभक्ती आणि रयतेच्या कल्याणाचा सर्वोच्च विचार- आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.🔔लोकशाहीच्या रक्षणासाठी लढलेल्या लोकतंत्र सेनानींचा त्याग नव्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे : आ. सुधीर मुनगंटीवार.