The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर च्या वतीने चंद्रपूरात भाजपचा विजय जल्लोष उत्साहात संपन्न.

News Image

फटाक्यांची आतिषबाजी, लाडू वाटप...

आसाम, पश्चिम बंगाल व पुडुचेरी येथे भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या ऐतिहासिक विजयाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर शहरात आयोजित जल्लोष कार्यक्रम उत्साहात पार पडला. भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर महानगरच्या वतीने गांधी चौक येथे हा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.

यावेळी भारतीय जनता पक्षाचे माजी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रघुविर अहिर, महामंत्री मनोज पाल, श्याम कनकम, नामदेव डाहुले, सविता दंढारे, माजी उपमहापौर अनिल फुलझेले, तुषार सोम, दशरथ सिंग ठाकूर, बलराम डोडाणी, सुधीर कारंगल, अमोल शेंडे, महिला महामंत्री सायली येरणे, युवा मोर्चा अध्यक्ष मयूर वाढई, अनुसूचित जमाती अध्यक्ष तथा नगरसेवक जितेश कुळमेथे, गटनेता शेखर शेट्टी, नगरसेवक संजय कंचर्लावार, भालचंद्र दानव, नितेश गवळी, नगरसेविका अनुजा तायडे, आशा देशमूख, सारिका संदुरकर, मजुश्री कासनगोट्टूवार, अनुसूचित जाती अध्यक्ष विमलताई कातकर, विनोद शेडकी, मंडळ अध्यक्ष स्वप्निल डुकरे अल्पसंख्यांक अध्यक्ष राशीद हुसेन, कौसर खान, सुजाता कापसे, कामगार झोपडपट्टी अध्यक्ष रामकुमार अकापल्लीवार, सिनेट सदस्य निलेश बेलखेडे, प्रलश मशाखत्री, प्रमोद शास्त्रकार, प्रविण गिलबिले, सतीश तायडे, भाजप नेते शिरीष गोगलवार, सागर बोरेवार, भाग्येश्री हांडेे, सुमित बेले, प्रतिक शिवणकर, कार्तीक बोरेवार, राकेश नाकाडे, बबलु मेश्राम, ईश्वर वाघमारे, रेषमा पांडे विनोद पेंडलीवार, सुरेंद्र अंचल, आदींची उपस्थिती होती.

यावेळी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांची आतीषबाजी करत तसेच लड्डू वाटप करून कार्यकर्ते व समर्थकांनी विजयाचा आनंद व्यक्त केला. संपूर्ण परिसर घोषणाबाजीने दुमदुमून गेला होता.पक्षाच्या या ऐतिहासिक यशाबद्दल एकमेकांचे अभिनंदन करत सर्वांनी आनंदोत्सव साजरा केला. एकूणच, भारतीय जनता पार्टीच्या विजयाचा हा जल्लोष चंद्रपूरात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या महानगर कार्यालयात घोषणाबाजी आणि फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. कार्यक्रमाला शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
ब्रेकिंग न्यूज़
🔔आमदर सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूरला शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयाची मंजुरी.🔔चंद्रपूरच्या वाहतूक कोंडीवर रिंगरोड च्या माध्यमातून कायमस्वरूपी उपाय करा - आमदार किशोर जोरगेवार.🔔पीएम श्री शहीद भगतसिंग प्राथमिक तथा उच्च प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव.🔔मोठी स्वप्ने पाहा; ज्ञान, जिद्द आणि कर्तृत्वाच्या बळावर महाराष्ट्राचा गौरव वाढवा! – आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔मोरवा येथील चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमावर कठोरात कठोर कारवाई करा!🔔छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही, तर स्वाभिमान, राष्ट्रभक्ती आणि रयतेच्या कल्याणाचा सर्वोच्च विचार- आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.🔔लोकशाहीच्या रक्षणासाठी लढलेल्या लोकतंत्र सेनानींचा त्याग नव्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे : आ. सुधीर मुनगंटीवार.