The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

डॉ. गोपाल मुंदडा यांचे निधन; चंद्रपूरने गमावले सेवाभावी व्यक्तिमत्त्व.

News Image

आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली भावपूर्ण शोकसंवेदना. चंद्रपूर येथील ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ, सामाजिक जाणीव आणि सेवाभावातून माणुसकी जपणारे डॉ. गोपाल मुंदडा यांच्या निधनाने चंद्रपूर शहरावर शोककळा पसरली आहे. शहराने एक हसतमुख, सेवाभावी आणि जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणारे व्यक्तिमत्त्व गमावले आहे, अशी अत्यंत भावनिक शोकसंवेदना राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. डॉ. मुंदडा हे केवळ कुशल बालरोगतज्ज्ञ नव्हते, तर समाजाच्या वेदना ओळखून त्यावर उपाय शोधणारे संवेदनशील व्यक्तिमत्त्व होते. चंद्रपूर बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्ष शहराच्या विविध प्रश्नांसाठी अथक लढा दिला. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक सामाजिक उपक्रम राबवले गेले आणि जनतेच्या हक्कांसाठी त्यांनी सातत्याने आवाज उठवला. त्यांच्या कार्याची दखल घेत महानगरपालिका तसेच विविध संस्थांकडून चंद्रपूर बचाव संघर्ष समितीला अनेक सन्मान मिळाले. डॉ. मुंदडा यांच्या रूपाने शहराने एक सेवाभावी डॉक्टर, जनतेचा जिव्हाळ्याचा आधार आणि सदैव हसतमुखाने मदतीला धावून येणारा माणूस गमावला आहे. त्यांचे कार्य आणि आठवणी चंद्रपूरच्या मनात सदैव जिवंत राहतील, असे आ. मुनगंटीवार यांनी नमूद केले. डॉ. मुंदडा यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आपण सर्वजण सहभागी आहोत. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो आणि कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो, अशी प्रार्थना आ. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
ब्रेकिंग न्यूज़
🔔आमदर सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूरला शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयाची मंजुरी.🔔चंद्रपूरच्या वाहतूक कोंडीवर रिंगरोड च्या माध्यमातून कायमस्वरूपी उपाय करा - आमदार किशोर जोरगेवार.🔔पीएम श्री शहीद भगतसिंग प्राथमिक तथा उच्च प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव.🔔मोठी स्वप्ने पाहा; ज्ञान, जिद्द आणि कर्तृत्वाच्या बळावर महाराष्ट्राचा गौरव वाढवा! – आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔मोरवा येथील चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमावर कठोरात कठोर कारवाई करा!🔔छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही, तर स्वाभिमान, राष्ट्रभक्ती आणि रयतेच्या कल्याणाचा सर्वोच्च विचार- आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.🔔लोकशाहीच्या रक्षणासाठी लढलेल्या लोकतंत्र सेनानींचा त्याग नव्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे : आ. सुधीर मुनगंटीवार.