Administration
Our Team Admin LoginConnect With Us
YouTube Facebook Instagram Twitter WhatsAppContact Us
thepatilnews@gmail.com
+91 8390794833, 9604938312
Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402
पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या शपथग्रहण सोहळ्याचे लाईव्ह टेलिकास्ट आज भारतीय जनता पार्टी महानगर कार्यालय, गांधी चौक, चंद्रपूर येथे उत्साहात पार पडले.

यावेळी चंद्रपूर महानगर महामंत्री श्याम कणकम, मनोज पाल, सविता दंडारे, विधानसभा प्रमुख दशरथसिंग ठाकूर, मंडळ अध्यक्ष प्रदीप किरमे, अँड. सारिका संदूरकर, महिला मोर्चा महामंत्री सायली तोंडरे, प्रसाद जोरगेवार, युवा मोर्चा महामंत्री सतीश तायडे, किसान आघाडी अध्यक्ष संजय बुरघाटे, बीएलआय प्रमुख सुमित बेले, अजय जैस्वाल, डॉ. अमल पोद्दार, अनुसूचित जाती आघाडी अध्यक्षा विमल कातकर, तेलुगू आघाडी अध्यक्ष ओमेश आयलू, अल्पसंख्याक आघाडी अध्यक्षा कौसर खान, विश्वजित शहा, मंडळ महामंत्री राकेश नाकाडे, कार्तिक बोरेवार, राकेश बोम्मावार, चंदन पाल, अनुराधा हजारे, हरमन जोसेफ, नूतन मेश्राम, तापोश डे, रंजन ठाकूर, शालू कन्नोजवार, बबलू मेश्राम, कल्पना शिंदे, आकाश लडके, रीना साखरकर, सोनू शुक्ला, राधेश्याम बाजपेयी, मनीषा पडगेलवार, अंजू तोडे, साई कोटा, प्रशांत द्विवेदी, रिता रॉय, निभा सरकार, निलेश्वरी पटले, माया रॉय आदींची उपस्थिती होती.

यावेळी “भारत माता की जय”, “वंदे मातरम्”, “भाजपा जिंदाबाद” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. पश्चिम बंगालमधील हा विजय देशातील जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर असलेला विश्वास अधिक दृढ करणारा आहे. विकास, राष्ट्रवाद आणि जनहिताच्या मुद्द्यांवर भारतीय जनता पार्टीला मिळालेला हा कौल ऐतिहासिक असून देशभरातील भाजपा कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.
वाचक प्रतिक्रिया (0)
तुमची प्रतिक्रिया नोंदवा: