The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत दिली राजकिय परिस्थीतीची माहिती.

News Image

मुंबई येथे भेट, सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना.

चंद्रपूर शहर महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीबाबत आमदार किशोर जोरगेवार आणि चिमूर मतदारसंघाचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथील वर्षा बंगल्यावर भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी चंद्रपूरातील सद्यस्थितीची सविस्तर माहिती त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली.या भेटीदरम्यान परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून चंद्रपूर शहर महानगरपालिकेत सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न सुरू ठेवण्याच्या स्पष्ट सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्याची माहिती आहे.चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष व काँग्रेस या दोन्ही पक्षांना स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याने सध्या दोन्ही पक्षांकडे सत्ता स्थापनेची समान संधी आहे. या दिशेने दोन्ही पक्षांकडून हालचाली सुरू असून, सत्ता स्थापनेसाठी विविध राजकीय समीकरणे जुळवली जात आहेत.दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या भेटीनंतर चंद्रपूरच्या राजकारणात नव्या समीकरणांची शक्यता निर्माण झाली आहे. चंद्रपूर शहर महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षालाही सत्ता स्थापनेची पूर्ण संधी असून, राज्याच्या सर्वांगीण विकासासह चंद्रपूर शहराच्या विकासाला गती देण्यासाठी महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आणण्याचे प्रयत्न अधिक प्रभावीपणे करण्याच्या स्पष्ट सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेटी दरम्यान दिल्या आहे.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात सुमारे ३० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात आणली असून तसा करार केला आहे. या गुंतवणुकीतून चंद्रपूरातील स्टील उद्योगालाही चालना देण्यात येणार असून, त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्था भक्कम होईल आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
ब्रेकिंग न्यूज़
🔔आमदर सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूरला शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयाची मंजुरी.🔔चंद्रपूरच्या वाहतूक कोंडीवर रिंगरोड च्या माध्यमातून कायमस्वरूपी उपाय करा - आमदार किशोर जोरगेवार.🔔पीएम श्री शहीद भगतसिंग प्राथमिक तथा उच्च प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव.🔔मोठी स्वप्ने पाहा; ज्ञान, जिद्द आणि कर्तृत्वाच्या बळावर महाराष्ट्राचा गौरव वाढवा! – आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔मोरवा येथील चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमावर कठोरात कठोर कारवाई करा!🔔छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही, तर स्वाभिमान, राष्ट्रभक्ती आणि रयतेच्या कल्याणाचा सर्वोच्च विचार- आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.🔔लोकशाहीच्या रक्षणासाठी लढलेल्या लोकतंत्र सेनानींचा त्याग नव्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे : आ. सुधीर मुनगंटीवार.