The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

आ. सुधीर मुनगंटीवार यांचा दिव्यांगाच्या विनंतीला २४ तासांत प्रतिसाद

News Image
  1. आ. मुनगंटीवार यांच्या संवेदनशील नेतृत्वाची पुन्हा एकदा प्रचिती दुसऱ्याच दिवशी थेट तीन चाकी सायकल घरी उपलब्ध करून दिली आ. सुधीर मुनगंटीवार यांनी तत्काळ दखल घेतल्यामुळे बालाजी वाढई यांना दिलासा
मुल - राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या संवेदनशील नेतृत्वाची आज पुन्हा एकदा प्रचिती आली. मुल तालुक्यातील मारोडा येथील रहिवासी व दिव्यांग नागरिक श्री. बालाजी सुखदेव वाढई यांनी दिनांक ९ जानेवारी २०२६ रोजी मारोडा येथे आयोजित मोफत रेती वाटप कार्यक्रमात आ. मुनगंटीवार यांच्याकडे तीन चाकी सायकल मिळावी, अशी भावनिक विनंती केली होती. त्यावर चोवीस तासांच्या आत कृती करून आ. मुनगंटीवार यांनी तत्परतेचे दर्शन घडवले. “दिव्यांग असल्यामुळे दैनंदिन हालचालींसाठी सायकल मिळावी” ही साधी पण अत्यंत महत्त्वाची मागणी आमदार श्री. मुनगंटीवार यांनी मनापासून ऐकून घेतली. आणि तिची तात्काळ दखल घेत अवघ्या एका दिवसात, दिनांक १० जानेवारी २०२६ रोजी, मागणीप्रमाणे तीन चाकी सायकल थेट मारोडा येथे उपलब्ध करून देण्यात आली. अवघ्या २४ तासांत सायकल पोहोचल्याने श्री. बालाजी वाढई यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान स्पष्टपणे दिसून आले. ही केवळ सायकलची मदत नसून, एका संवेदनशील नेत्याने दिव्यांगाच्या वेदनेला समजून घेत दिलासा दिल्याचा मानवी स्पर्श आहे. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल व संवेदनशीलतेबद्दल श्री. बालाजी वाढई यांच्या आईने मनापासून आभार व्यक्त केले असून, अशा संवेदनशील नेतृत्वामुळेच सामान्य नागरिकांचा लोकप्रतिनिधींवरील विश्वास अधिक दृढ होत असल्याची भावना यावेळी व्यक्त केली.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
ब्रेकिंग न्यूज़
🔔आमदर सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूरला शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयाची मंजुरी.🔔चंद्रपूरच्या वाहतूक कोंडीवर रिंगरोड च्या माध्यमातून कायमस्वरूपी उपाय करा - आमदार किशोर जोरगेवार.🔔पीएम श्री शहीद भगतसिंग प्राथमिक तथा उच्च प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव.🔔मोठी स्वप्ने पाहा; ज्ञान, जिद्द आणि कर्तृत्वाच्या बळावर महाराष्ट्राचा गौरव वाढवा! – आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔मोरवा येथील चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमावर कठोरात कठोर कारवाई करा!🔔छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही, तर स्वाभिमान, राष्ट्रभक्ती आणि रयतेच्या कल्याणाचा सर्वोच्च विचार- आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.🔔लोकशाहीच्या रक्षणासाठी लढलेल्या लोकतंत्र सेनानींचा त्याग नव्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे : आ. सुधीर मुनगंटीवार.