The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

महानगरपालिका मतदान व मतमोजणी कालावधीत तीन दिवस वाहतूक व्यवस्थेत बदल

News Image

चंद्रपूर,दि. 13 : चंद्रपूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीकरीता 15 जानेवारी रोजी मतदान तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार आहे. शहरातील इंडस्ट्रिअल ईस्टेट वार्ड, एम.आय.डी.सी, बंगाली कॅम्प चौक येथे स्ट्रॉंग रूम तयार करण्यात आली असून झोनच्या मागील बाजूने निवडणुकीच्या वाहनांकरीता 14 ते 16 जानेवारी या कालावधीत बसेस करीता पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने 1) शिवशक्ती सिमेंट प्रोडक्शन ते हिरामोती फर्निचर दुकान पर्यंत 2) हिरामोती फर्निचर दुकान ते आर्यन के स्टोर्ट शॉप पर्यंत 3) मराठा फेब्रीकेशन दुकान ते एम.एस.सी.बी कार्यालय आतील परीसरकडे जाणारा रोड पर्यंतचा रस्ता, सर्व प्रकारच्या वाहनांना बंद ठेवण्यात येत आहे. नागरिकानी या मार्गावर शक्यतो वाहने पार्किंग करू नये. सदर अधिसूचना 14 जानेवारीच्या सकाळी 8 वाजतापासून 16 जानेवारीच्या सायंकाळी 6 वाजेपर्यंत अंमलात राहील. तसेच सदर अधिसुचनेच्या अमंलबजावणीमध्ये आवश्यक्तेनुसार बदल करण्यात येईल. सदर परिसरात राहणाऱ्या नागरिकांव्यतिरिक्त इतर नागरिकांना नमुद रस्ता पुर्णपणे बंद करण्यात येत आहे. तरी नागरिकांनी वरील अधिसुचनेचे पालन करून शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरीता पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांनी केले आहे.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
ब्रेकिंग न्यूज़
🔔आमदर सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूरला शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयाची मंजुरी.🔔चंद्रपूरच्या वाहतूक कोंडीवर रिंगरोड च्या माध्यमातून कायमस्वरूपी उपाय करा - आमदार किशोर जोरगेवार.🔔पीएम श्री शहीद भगतसिंग प्राथमिक तथा उच्च प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव.🔔मोठी स्वप्ने पाहा; ज्ञान, जिद्द आणि कर्तृत्वाच्या बळावर महाराष्ट्राचा गौरव वाढवा! – आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔मोरवा येथील चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमावर कठोरात कठोर कारवाई करा!🔔छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही, तर स्वाभिमान, राष्ट्रभक्ती आणि रयतेच्या कल्याणाचा सर्वोच्च विचार- आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.🔔लोकशाहीच्या रक्षणासाठी लढलेल्या लोकतंत्र सेनानींचा त्याग नव्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे : आ. सुधीर मुनगंटीवार.