The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

205 अधिकारी-कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी.

News Image

सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे आयोजन.

चंद्रपूर, दि. 07 : सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या संकल्पनेतून जिल्हाधिकारी कार्यालय व परिसरातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. नियोजन भवन येथे 6 ऑक्टोबर रोजी आयोजित या शिबिरात विविध विभागांतील 205 अधिकारी-कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.

जिल्ह्यात दि. 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाचा भाग म्हणून कर्मवीर मा.सा. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पंडित दीनदयाल उपाध्याय कॅन्सर हॉस्पिटल आणि जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने या विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. विविध शासकीय कार्यालयातील 205 अधिकारी व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यात 149 जणांची रक्त तपासणी, 175 जणांची बीपी आणि शुगर तपासणी, 65 जणांची दंत तपासणी, 93 जणांची ईसीजी करण्यात आली.

यावेळी जिल्हाधिकारी वसुमना पंत, अपर जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, निवासी उपजिल्हाधिकारी, दगडू कुंभार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष सहभागी झाले आणि त्यांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. शिबिरासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कॅन्सर हॉस्पिटल आणि जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयातील फिजिशियन, सर्जन, स्त्रीरोग तज्ज्ञ तसेच विविध विषयांतील तज्ज्ञ डॉक्टर व त्यांच्या सहकार्यांनी सेवा दिली.

यासोबतच मानसोपचार तज्ज्ञ तथा प्रमुख मार्गदर्शक डॉ. सायली दाभेराव आणि क्लिनिकल डायटिशियन डॉ. प्रिती कांबळे (जनबंधु) यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. शिबिराच्या समारोपप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी कुंभार यांनी आरोग्य तपासणीसाठी सेवा देणाऱ्या सर्व तज्ज्ञ डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, सहायक कर्मचारी यांचे आभार मानले.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
×
ब्रेकिंग न्यूज़
🔔आठ वर्षा पासून फरार पाहिजे असलेला आरोपी स्था.गु.शा. चंद्रपूर च्या ताब्यात.🔔आमदार किशोर जोरगेवार सपत्नीक पालखी सोहळ्यात सहभागी; एकविरा माता मंदिरातून निघालेल्या पालखीने श्री माता महाकाली  महोत्सवाचा शुभारंभ.🔔संविधान वाचविण्यासाठी काँग्रेसला बळ द्या : सिरिवेल्ला प्रसाद.🔔विद्यार्थ्यांची आवेदनपत्र भरण्याच्या वेळापत्रकाला मुदतवाढ.🔔22 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान राज्यभरात ‘खेत बचाओ अभियान’.🔔दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांना सर्वोच्च प्राधान्य द्या. जिल्हाधिका-यांच्या यंत्रणांना सुचना.🔔अभिजित वंजारी यांच्या विजयासाठी काँग्रेस एकवटली!🔔जिल्ह्यातील 50 ग्रामपंचायतींमध्ये ‘स्वस्तिक पद्धतीने वृक्ष लागवड’ मोहिमेचा शुभारंभ.