The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

१०० टक्के उद्दिष्ट गाठत मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजना यशस्वी करा - आ. किशोर जोरगेवार.

News Image

उपविभागीय कार्यालयात आढावा बैठक.

चंद्रपूर विधानसभा मतदारसंघ पाणंद रस्त्यांनी युक्त करण्याचा आपला ठाम संकल्प असून मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकर्यांसाठी पायाभूत सुविधा सक्षम केल्या जाणार आहेत. मात्र या योजनेचा खरा लाभ शेतकर्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रशासनाने सर्व विभागांमध्ये समन्वय साधत १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी काटेकोर नियोजन करावे, असे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी दिल्या.

मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात शुक्रवारी उपविभागीय कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद चौगुले, तहसिलदार विजय पवार, नायब तहसीलदार राजु धांडे, गट विकास अधिकारी संगीता भांगडे, वन परिक्षेत्र अधिकारी जि. आर नायगमकर, एस. व्ही मव्हेशंकर, उपकृषी अधिकारी व्ही. बी बुग्गेवार, महसुल अधिकारी व्ही.एम कुरेवार, के. टी मोडकवार, प्रविणकुमार वर्भे, विनोद गणफाडे, प्रकाश सुर्वे, भुकरमापक व्हि.डी राठोड, तलाठी, एस. एन दुर्गे, एस. आर नगराळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे के. एस आश्राम, यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, शेतकर्यांना थेट शेतापर्यंत पोहोचता यावे, शेतीमालाची वाहतूक सुलभ व्हावी आणि ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी पाणंद रस्ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे केवळ कागदावर नव्हे, तर प्रत्यक्षात दर्जेदार आणि उपयोगी रस्ते तयार झाले पाहिजेत, याकडे प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे.

यावेळी आमदार जोरगेवार यांनी विविध विभागांना ठोस सूचना दिल्या. वन विभाग आणि सामाजिक वनीकरण विभागाने पाणंद रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी वृक्षारोपण करावे, अतिक्रमित पाणंद रस्ते मोकळे करावे, तसेच ग्रामपंचायतींकडून आवश्यक प्रस्ताव मागवावेत, असे त्यांनी सांगितले.

तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने आतापर्यंत झालेल्या कामांची स्वतंत्र छाननी करावी, सध्या किती पाणंद रस्ते प्रत्यक्ष वापरात आहेत याचे सर्वेक्षण करावे आणि भविष्यातील गरज लक्षात घेऊन नियोजनबद्ध आराखडा तयार करावा, अशाही स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.

या बैठकीत योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कालबद्ध कार्यवाही, विभागनिहाय जबाबदारी निश्चित करणे आणि नियमित आढावा घेण्यावर भर देण्यात आला. पाणंद रस्ते म्हणजे केवळ रस्ता नाही, तर शेतकर्याच्या कष्टाला बाजारपेठेपर्यंत पोहोचवणारा मार्ग आहे. त्यामुळे दर्जेदार काम, योग्य नियोजन आणि वेळेत अंमलबजावणी यावर भर दिला पाहिजे. या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी मी स्वतः नियमित आढावा घेणार आहे. चंद्रपूर मतदारसंघातील प्रत्येक शेतकरी या योजनेचा लाभार्थी झाला पाहिजे, असे ते यावेळी म्हणाले.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
ब्रेकिंग न्यूज़
🔔आमदर सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूरला शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयाची मंजुरी.🔔चंद्रपूरच्या वाहतूक कोंडीवर रिंगरोड च्या माध्यमातून कायमस्वरूपी उपाय करा - आमदार किशोर जोरगेवार.🔔पीएम श्री शहीद भगतसिंग प्राथमिक तथा उच्च प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव.🔔मोठी स्वप्ने पाहा; ज्ञान, जिद्द आणि कर्तृत्वाच्या बळावर महाराष्ट्राचा गौरव वाढवा! – आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔मोरवा येथील चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमावर कठोरात कठोर कारवाई करा!🔔छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही, तर स्वाभिमान, राष्ट्रभक्ती आणि रयतेच्या कल्याणाचा सर्वोच्च विचार- आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.🔔लोकशाहीच्या रक्षणासाठी लढलेल्या लोकतंत्र सेनानींचा त्याग नव्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे : आ. सुधीर मुनगंटीवार.