The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

रोड शोच्या माध्यमातून भाजपचे शक्तिप्रदर्शन; मनपात भाजपचीच सत्ता येणार, सर्व नेत्यांचा निर्धार

News Image

५ हजारांहून अधिक दुचाकींच्या सहभागाने चंद्रपूरात शक्तिप्रदर्शन.

चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी, शिवसेना व आरपीआय (आठवले गट) यांच्या वतीने महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित भव्य रोड शो मंगळवारी दुपारी चंद्रपूर शहरात उत्साहात व जल्लोषात पार पडला. या रोड शोमध्ये तब्बल ५ हजारांहून अधिक दुचाकी सहभागी झाल्या होत्या. युवकांचा प्रचंड सहभाग, घोषणांचा गजर आणि पक्षाचे झेंडे यामुळे संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.यावेळी पालकमंत्री अशोक उईके, राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार, आमदार मिलिंद नरोटे, आमदार राजू तोडसाम, माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुलवार, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष हरिष शर्मा यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.दुपारी ३ वाजता नेहरू नगर जॉगर्स पार्क, बंगाली कॅम्प येथून रोड शोचा प्रारंभ झाला. त्यानंतर आदर्श पेट्रोल पंप, सी.एच.एल. हॉस्पिटल, गुरुद्वारा, जटपुरा गेट, गिरणार चौक, गांधी चौक मार्गे हा रोड शो जोडदेऊळ चौक येथे पोहोचला. येथे रोड शोचे रूपांतर सभेत झाले. मार्गभर नागरिकांनी रोड शोचे उत्स्फूर्त स्वागत केले.महायुतीच्या माध्यमातून शहरात झालेल्या विकासकामांचा संदेश घराघरात पोहोचवणे, तसेच महानगरपालिका निवडणुकीत भाजप व मित्रपक्षांच्या उमेदवारांना भक्कम पाठिंबा मिळवणे, हा या रोड शोचा प्रमुख उद्देश होता. युवकांचा जोश, शिस्तबद्ध सहभाग आणि हजारो दुचाकींच्या उपस्थितीमुळे चंद्रपूर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र दिसून आले.या रोड शोमध्ये भाजप, शिवसेना व आरपीआयचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महायुतीचे उमेदवार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ५ हजारांहून अधिक दुचाकींच्या सहभागाने पार पडलेला हा रोड शो महायुतीच्या ताकदीचे आणि निवडणुकीतील आत्मविश्वासाचे स्पष्ट दर्शन घडवणारा ठरला. या निवडणुकीत भाजप एकत्रितपणे प्रचाराच्या मैदानात उतरलेली दिसत असताना, काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा उघडकीस आली. समारोपीय सभेत बोलताना चंद्रपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपला बहुमताने विजयी करण्याचे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केले.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
ब्रेकिंग न्यूज़
🔔आमदर सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूरला शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयाची मंजुरी.🔔चंद्रपूरच्या वाहतूक कोंडीवर रिंगरोड च्या माध्यमातून कायमस्वरूपी उपाय करा - आमदार किशोर जोरगेवार.🔔पीएम श्री शहीद भगतसिंग प्राथमिक तथा उच्च प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव.🔔मोठी स्वप्ने पाहा; ज्ञान, जिद्द आणि कर्तृत्वाच्या बळावर महाराष्ट्राचा गौरव वाढवा! – आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔मोरवा येथील चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमावर कठोरात कठोर कारवाई करा!🔔छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही, तर स्वाभिमान, राष्ट्रभक्ती आणि रयतेच्या कल्याणाचा सर्वोच्च विचार- आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.🔔लोकशाहीच्या रक्षणासाठी लढलेल्या लोकतंत्र सेनानींचा त्याग नव्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे : आ. सुधीर मुनगंटीवार.