The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

चंद्रपूर जिल्ह्यासाठी धान खरेदीचे उद्दिष्ट ३ लाख क्विंटलने वाढवा.आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांची केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींकडे मागणी.

News Image
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा; सकारात्मक प्रतिसाद. चंद्रपूर - राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार पुन्हा एकदा चंद्रपूर जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी धावून आले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या लक्षात घेता, खरीप हंगाम २०२५-२६ साठी धान खरेदीचे उद्दिष्ट ३ लाख क्विंटलने वाढवून द्यावे, अशी मागणी आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे केली आहे. दि. २१ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या दूरध्वनीवरील चर्चेचा संदर्भ देत आमदार श्री. मुनगंटीवार यांनी हे पत्र लिहिले असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी केली आहे. चंद्रपूर जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार, जिल्ह्यात आधारभूत किंमत धान खरेदी योजनेअंतर्गत एकूण ३९ केंद्रांना परवानगी देण्यात आली आहे. या केंद्रांवर ९१,६७१ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या उत्पादकतेच्या अहवालाच्या निकषानुसार (प्रति हेक्टर ११.४४ क्विंटल) एकूण ३०,५७,०६७.५९ क्विंटल धान ऑनलाईन प्रणालीवर नोंदवले गेले आहे. मात्र, जिल्ह्याला आतापर्यंत केवळ ५,४७,९९१.५९ क्विंटल धान खरेदीचेच उद्दिष्ट प्राप्त झाले होते. यापैकी ५,०७,७०९.०७ क्विंटल धान खरेदी आधीच पूर्ण झाली असून, उर्वरित उद्दिष्ट येत्या दोन दिवसांत संपण्याच्या मार्गावर आहे, याचा आमदार श्री. मुनगंटीवार यांनी आवर्जून उल्लेख केला आहे. सध्याची स्थिती अत्यंत चिंताजनक असून, ऑनलाईन नोंदणी झालेली असतानाही स्लॉट उपलब्ध नसल्यामुळे सुमारे २ ते ३ लाख क्विंटल धान हे खरेदी केंद्रांच्या परिसरात उघड्यावर पडून आहे. हवामानातील बदल किंवा अन्य कारणांमुळे हे धान खराब झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते, याकडेही त्यांनी केंद्रीय मंत्र्यांचे लक्ष वेधले. जिल्ह्याचा एकूण अंदाज पाहता ८ ते १० लाख क्विंटल उद्दिष्टाची मागणी करण्यात आली होती, मात्र अद्याप वाढीव कोटा मिळालेला नाही. त्यामुळे शासन स्तरावर तातडीने हस्तक्षेप करून चंद्रपूर जिल्ह्यासाठी किमान ३ लाख क्विंटलचे अतिरिक्त उद्दिष्ट मंजूर करण्याचे निर्देश संबंधित विभागाला द्यावेत, असे आ. श्री. मुनगंटीवार यांनी पत्रात नमूद केले आहे.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
ब्रेकिंग न्यूज़
🔔आमदर सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूरला शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयाची मंजुरी.🔔चंद्रपूरच्या वाहतूक कोंडीवर रिंगरोड च्या माध्यमातून कायमस्वरूपी उपाय करा - आमदार किशोर जोरगेवार.🔔पीएम श्री शहीद भगतसिंग प्राथमिक तथा उच्च प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव.🔔मोठी स्वप्ने पाहा; ज्ञान, जिद्द आणि कर्तृत्वाच्या बळावर महाराष्ट्राचा गौरव वाढवा! – आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔मोरवा येथील चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमावर कठोरात कठोर कारवाई करा!🔔छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही, तर स्वाभिमान, राष्ट्रभक्ती आणि रयतेच्या कल्याणाचा सर्वोच्च विचार- आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.🔔लोकशाहीच्या रक्षणासाठी लढलेल्या लोकतंत्र सेनानींचा त्याग नव्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे : आ. सुधीर मुनगंटीवार.