The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

आमदार किशोर जोरगेवार आणि हंसराज अहिर यांचा पदयात्रेच्या माध्यमातून महायुतीच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार

News Image

चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर आणि आमदार किशोर जोरगेवार यांनी शहरातून पदयात्रा काढत जोरदार प्रचार केला. या पदयात्रेच्या माध्यमातून दोन्ही नेत्यांनी थेट नागरिकांशी संवाद साधत महायुतीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले. 

 शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आलेल्या या रोड पदयात्रेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीसह आणि पक्षाचे झेंडे हातात घेऊन कार्यकर्त्यांनी उत्साहात सहभाग घेतला. ठिकठिकाणी नागरिकांनी दोन्ही नेत्यांचे स्वागत करत प्रचाराला भरघोस प्रतिसाद दिला. यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, चंद्रपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती कटिबद्ध असून केंद्र व राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा थेट लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम सुरू आहे. महानगरपालिकेत विकासाभिमुख नेतृत्व आवश्यक असून त्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना विजयी करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनीही नागरिकांना संबोधित करताना सांगितले की, भाजप हा केवळ निवडणूक जिंकणारा पक्ष नसून समाजातील प्रत्येक घटकाच्या हितासाठी काम करणारा पक्ष आहे. ओबीसी, आदिवासी, दलित, महिला व युवकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांमुळे सामान्य जनतेला थेट लाभ मिळत आहे. या विकासाचा प्रवाह कायम ठेवण्यासाठी महायुतीला बळ देण्याचे आवाहन त्यांनी केले. या पदयात्रे मध्ये महायुतीचे उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने शहरातील नागरिक सहभागी झाले होते. नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे महायुतीच्या प्रचाराला मोठी गती मिळाल्याचे चित्र यावेळी दिसून आले.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
ब्रेकिंग न्यूज़
🔔आमदर सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूरला शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयाची मंजुरी.🔔चंद्रपूरच्या वाहतूक कोंडीवर रिंगरोड च्या माध्यमातून कायमस्वरूपी उपाय करा - आमदार किशोर जोरगेवार.🔔पीएम श्री शहीद भगतसिंग प्राथमिक तथा उच्च प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव.🔔मोठी स्वप्ने पाहा; ज्ञान, जिद्द आणि कर्तृत्वाच्या बळावर महाराष्ट्राचा गौरव वाढवा! – आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔मोरवा येथील चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमावर कठोरात कठोर कारवाई करा!🔔छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही, तर स्वाभिमान, राष्ट्रभक्ती आणि रयतेच्या कल्याणाचा सर्वोच्च विचार- आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.🔔लोकशाहीच्या रक्षणासाठी लढलेल्या लोकतंत्र सेनानींचा त्याग नव्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे : आ. सुधीर मुनगंटीवार.