The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

आमदार सुधीर मुनगंटीवार यांची कापूस खरेदीला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी.आमदार मुनगंटीवार यांची सीसीआय मुंबईचे चेअरमन श्री. ललितकुमार गुप्ता यांच्याकडेही मागणी .

News Image

शेतकऱ्यांच्या हितासाठी आमदार मुनगंटीवार यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन .

अतिवृष्टीमुळे काढणीला उशीर; अनेक शेतकरी एमएसपीपासून वंचित राहण्याची भीती .

चंद्रपूर - राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी सन २०२५-२६ हंगामातील कापूस खरेदीसाठी जाहीर करण्यात आलेली २७ फेब्रुवारी २०२६ ही अंतिम मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढविण्याची मागणी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमतीचा (एमएसपी) लाभ मिळावा आणि अतिवृष्टीमुळे उशिरा सुरू झालेल्या काढणीमुळे कोणीही वंचित राहू नये, या उद्देशाने त्यांनी पत्राद्वारे तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती केली आहे. यासोबतच सीसीआय मुंबईचे चेअरमन श्री. ललितकुमार गुप्ता यांच्याकडेही निवेदनाद्वारे मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात आ. सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे की, भारतीय कपास निगम लिमिटेड (सीसीआय) मार्फत एमएसपी अंतर्गत कापूस खरेदीची अंतिम तारीख २७ फेब्रुवारी २०२६ निश्चित करण्यात आली आहे. कपास किसान ॲपवर नोंदणीकृत शेतकऱ्यांना या मुदतीपूर्वी स्लॉट बुक करून जवळच्या खरेदी केंद्रावर कापूस विक्री करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, राज्यातील अनेक भागांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीत अद्याप ओलावा कायम असून कापूस वेचणी व काढणीला विलंब होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यासह विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या घरी अजून कापूस पोहोचलेला नाही. त्यामुळे ते एमएसपी योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांच्या अडचणींप्रती कायम संवेदनशील असलेले नेते आ. सुधीर मुनगंटीवार यांनी या परिस्थितीची तातडीने दखल घेत मुदतवाढीची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर कृषी मूल्य आयोगाचे सदस्य बंडू मधुकर गौरकार यांनी आ.सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन सादर केले असून, त्याची दखल घेत, आ. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवत मुदतवाढीची मागणी केली आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी सीसीआयमार्फत खरेदीची अंतिम तारीख ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढविणे आवश्यक असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. तसेच, संबंधित विभागांना तातडीने निर्देश देऊन आवश्यक कार्यवाही करण्याची विनंतीही करण्यात आली आहे. यासोबतच सीसीआय मुंबईचे चेअरमन श्री. ललितकुमार गुप्ता यांच्याकडेही आ. मुनगंटीवार यांनी पत्राद्वारे मागणी केली आहे.राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून, आता मुख्यमंत्र्यांकडून याबाबत कोणती भूमिका घेतली जाते याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
ब्रेकिंग न्यूज़
🔔आमदर सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूरला शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयाची मंजुरी.🔔चंद्रपूरच्या वाहतूक कोंडीवर रिंगरोड च्या माध्यमातून कायमस्वरूपी उपाय करा - आमदार किशोर जोरगेवार.🔔पीएम श्री शहीद भगतसिंग प्राथमिक तथा उच्च प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव.🔔मोठी स्वप्ने पाहा; ज्ञान, जिद्द आणि कर्तृत्वाच्या बळावर महाराष्ट्राचा गौरव वाढवा! – आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔मोरवा येथील चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमावर कठोरात कठोर कारवाई करा!🔔छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही, तर स्वाभिमान, राष्ट्रभक्ती आणि रयतेच्या कल्याणाचा सर्वोच्च विचार- आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.🔔लोकशाहीच्या रक्षणासाठी लढलेल्या लोकतंत्र सेनानींचा त्याग नव्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे : आ. सुधीर मुनगंटीवार.