The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने कोठारी गावात खनीज विकास निधी अंतर्गत 5 कोटी रु. किंमतीचे अंतर्गत सिमेंट रस्ते व बंदिस्त नाली बांधकामाला मंजुरी.

News Image

बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने कोठारी गावात खनीज विकास निधी अंतर्गत रु. ५ कोटी किंमतीचे अंतर्गत सिमेंट रस्ते व बंदिस्त नाली बांधकामाला मंजुरी मिळाली आहे. आ. मुनगंटीवार यांनी कोठारी वासियांना सदर विकासकामांबाबत दिलेला शब्द पूर्ण केला आहे. कोठारी गावातील छत्रपती चौक (रा. महामार्ग ३५३) ते मारोती बुटले यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता व बंधिस्त नालीचे व इतर अंतर्गत रस्त्याचे बांधकाम करणे  तसेच दिलीप पर्लेवार यांचा घरापासून ते प्रजीमा ४२ व कवडू गुरु (रा. महामार्ग ३५३) ते आंबेडकर चौक व संत गाडगे बाबा चौक ते सचिन शेंडे (प्रजीमा ४२) यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता व बंधिस्त नालीचे व इतर अंतर्गत रस्त्याचे बांधकाम करणे या दोन विकास कामांसाठी प्रत्येकी अडीच कोटी याप्रमाणे एकूण पाच कोटी रु निधी मंजूर करण्यात आला आहे. याआधीही कोठारी गावात आ. मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने कोठारी परिसरात पाणी पुरवठा योजना, पोलिस स्‍टेशन इमारत, व्‍यायामशाळा, ईटोली-मानोरा-कोठारी-कवडजई या १ कोटी ५५ लक्ष रु. किंमतीच्या रस्त्याचे बांधकाम, नायब तहसिलदार कार्यालय, संरक्षक भिंत व सिमेंट कॉंक्रीट रस्‍ता बांधकाम, जिल्‍हा परिषद शाळेच्‍या वर्गखोल्‍यांचे बांधकाम, सिमेंट रस्‍त्‍यांचे बांधकाम, श्‍यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयाचे बांधकाम, रविदास महाराज समाजभवनाचे बांधकाम, हनुमान मंदिर फुटके देवस्‍थान सभागृह आदी विकासकामे मंजूर करण्यात आली आहेत. खनीज विकास निधीतून रु. ५ कोटी निधी मंजूर केल्याबद्दल सरपंच अश्‍वीनी वासमवार, उपसरपंच सुनिल फरकडे, संतोष लोनगाडगे, किशोर कोटरंगे, रतन वासनिक, रूपेश वासमवार, जयश्री भोयर, कविता वासमवार, प्रशांत पोटदुखे, वनिता खोब्रागडे, शिला देवाडकर, स्‍वाती कोडापे, कोमल लाटेलवार, स्‍नेहल टिंबडीया, आदींनी आ. सुधीर मुनगंटीवार यांचे अभिनंदन व आभार व्यक्त केले आहे.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
ब्रेकिंग न्यूज़
🔔आमदर सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूरला शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयाची मंजुरी.🔔चंद्रपूरच्या वाहतूक कोंडीवर रिंगरोड च्या माध्यमातून कायमस्वरूपी उपाय करा - आमदार किशोर जोरगेवार.🔔पीएम श्री शहीद भगतसिंग प्राथमिक तथा उच्च प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव.🔔मोठी स्वप्ने पाहा; ज्ञान, जिद्द आणि कर्तृत्वाच्या बळावर महाराष्ट्राचा गौरव वाढवा! – आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔मोरवा येथील चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमावर कठोरात कठोर कारवाई करा!🔔छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही, तर स्वाभिमान, राष्ट्रभक्ती आणि रयतेच्या कल्याणाचा सर्वोच्च विचार- आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.🔔लोकशाहीच्या रक्षणासाठी लढलेल्या लोकतंत्र सेनानींचा त्याग नव्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे : आ. सुधीर मुनगंटीवार.