The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त सरदार पटेल स्मृती व्याख्यानमाला, प्रकल्प प्रदर्शन आणि पोस्टर स्पर्धेचे आयोजन.

News Image

चंद्रपूर :

सरदार पटेल मेमोरियल सोसायटी (ट्रस्ट) द्वारा संचलित राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, रिसर्च अँड टेक्नॉलॉजी, चंद्रपूर येथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान आणि मानविकी विभागाच्या वतीने “सरदार पटेल स्मृती व्याख्यानमाला” तसेच प्रकल्प प्रदर्शन आणि पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता सी. जी. पटेल सभागृहात पार पडला.
 
एआयसीटीई, नवी दिल्ली आणि डीटीई महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, लोनेरेशी संलग्न असलेल्या या महाविद्यालयात आयोजित व्याख्यानमालेचा विषय भविष्यातील व्यावसायिकांसाठी व्यक्तिमत्व विकास : जपान-भारत जागतिक करिअरचा पूल हा होता.
 
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी वक्ते म्हणून जपानच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत डीएक्स इनोव्हेशन लॅबचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. वैभव गीता पंकज मेहता यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील करिअर संधी, जपान-भारत तांत्रिक सहकार्य, तसेच कौशल्य विकासाच्या संधींबाबत सविस्तर माहिती दिली.
 
परिचय-२ या सत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) विषयावर विशेष मार्गदर्शन करण्यात आले. ANI, AGI आणि ASI या संकल्पनांमधील फरक स्पष्ट करताना कृत्रिम अरुंद बुद्धिमत्ता (ANI) ही विशिष्ट कामांसाठी डिझाइन केलेली प्रणाली असल्याचे सांगण्यात आले. कृत्रिम सामान्य बुद्धिमत्ता (AGI) ही मानवासारखी सर्व कामे करू शकणारी प्रणाली असून, कृत्रिम सुपर इंटेलिजन्स (ASI) ही मानवापेक्षा अधिक बुद्धिमान असण्याची संकल्पना विज्ञानकथांमध्ये आढळते, असे त्यांनी स्पष्ट केले.
 
याच निमित्ताने विज्ञान आणि मानव्यविद्या विभागाच्या वतीने प्रकल्प प्रदर्शन आणि पोस्टर स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विज्ञान-तंत्रज्ञान विषयक विविध नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर करत आपली सर्जनशीलता आणि संशोधनवृत्ती दाखवून दिली.
 
सदर कार्यक्रमात सरदार पटेल स्मृती व्याख्यानमालेचे समन्वयक डॉ. वर्षा सदरानी आणि प्रकल्प प्रदर्शन आणि पोस्टर स्पर्धेचे समन्वयक डॉ. अविनाश चल्लेलवार यांनी कार्य पाहिले. प्रा. निखिल दुबे (प्रभारी, एफ.वाय.बी. टेक), डॉ. प्रा. पियाली चक्रवर्ती, प्रा. निलेश नंदनवार वर, प्रा. सन्ना अली आणि इतर प्रज्ञापक वर्ग यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात मोलाची भूमिका बजावली.
 
प्राचार्य डॉ. अनिल चिताडे यांनी विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या क्षेत्रात नवनवीन संशोधन करण्यासाठी प्रेरित केले.
 
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन इशिका गणवीर यांनी केले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन यामुळे राष्ट्रीय विज्ञान दिनाचा कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.
=========================
 
Pro rcert chandrapur

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
ब्रेकिंग न्यूज़
🔔आमदर सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूरला शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयाची मंजुरी.🔔चंद्रपूरच्या वाहतूक कोंडीवर रिंगरोड च्या माध्यमातून कायमस्वरूपी उपाय करा - आमदार किशोर जोरगेवार.🔔पीएम श्री शहीद भगतसिंग प्राथमिक तथा उच्च प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव.🔔मोठी स्वप्ने पाहा; ज्ञान, जिद्द आणि कर्तृत्वाच्या बळावर महाराष्ट्राचा गौरव वाढवा! – आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔मोरवा येथील चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमावर कठोरात कठोर कारवाई करा!🔔छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही, तर स्वाभिमान, राष्ट्रभक्ती आणि रयतेच्या कल्याणाचा सर्वोच्च विचार- आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.🔔लोकशाहीच्या रक्षणासाठी लढलेल्या लोकतंत्र सेनानींचा त्याग नव्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे : आ. सुधीर मुनगंटीवार.