The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

चंद्रपूर शहरातील श्री विठ्ठल मंदिर देवस्थानास ‘ब’ वर्ग दर्जा प्रदान करण्यात यावा.

News Image

आमदार सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. चंद्रपूर शहरातील श्री विठ्ठल मंदिर देवस्थानास ‘ब’ वर्ग दर्जा प्रदान करण्याची मागणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात आमदार मुनगंटीवार यांनी म्हटले आहे की चंद्रपूर शहराला सुमारे ८०० हून अधिक वर्षांचा समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. गोंड राजवटीपासून भोसलेकालीन परंपरेपर्यंत या शहराने सांस्कृतिक, धार्मिक व सामाजिक दृष्ट्या उल्लेखनीय प्रगती साधलेली आहे. किल्ले, प्राचीन वास्तू व विविध देवस्थाने ही या शहराची ओळख ठरली आहेत. माता महाकाली, श्री अंचलेश्वर आणि भगवान श्री विठ्ठल ही या शहराची आराध्य आहेत. चंद्रपूर शहरातील श्री विठ्ठल मंदिर हे अत्यंत प्राचीन व ऐतिहासिक देवस्थान असून, अनेक दशकांपासून भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र राहिले आहे. मंदिर परिसरात वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम, कीर्तन, भजन व उत्सव आयोजित केले जातात. दरवर्षी आषाढी व कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने मंदिरातून भव्य रथयात्रा काढण्यात येते. हा रथ संपूर्ण शहरातून मार्गक्रमण करतो. या वेळी हजारो भाविक मोठ्या श्रद्धेने सहभागी होतात. शहरातील विविध भागांतून नागरिक, महिला मंडळे, वारकरी संप्रदायाचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. ही परंपरा अनेक वर्षांपासून अखंडितपणे सुरू असून, शहराच्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे.विठू नामाचा गजर करत भाविक सतत या मंदिरात येतात. दरवर्षी भाविकांची संख्या लक्षणीयरीत्या वाढत आहे. उत्सव काळात कायदा-सुव्यवस्था, स्वच्छता, पाणीपुरवठा व इतर मूलभूत सुविधांची आवश्यकता भासते. मंदिरास ‘ब’ वर्ग दर्जा प्राप्त झाल्यास शासन स्तरावरून आर्थिक व प्रशासकीय सहाय्य उपलब्ध होऊन सदर कामे अधिक सक्षमपणे करता येईल. हे मंदिर चंद्रपूर शहरातील नागरिकांचा भावनिक ठेवा आहे असेही आमदार मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

श्री विठ्ठल मंदिर देवस्थानास शासनाच्या नियमानुसार ‘ब’ वर्ग दर्जा प्रदान करण्यात यावा यासाठी चंद्रपूर जिल्हा नियोजन समितीचा ठराव  आमदार मुनगंटीवार यांच्या विनंती नुसार पारित करण्यात आला आहे.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
ब्रेकिंग न्यूज़
🔔आमदर सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूरला शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयाची मंजुरी.🔔चंद्रपूरच्या वाहतूक कोंडीवर रिंगरोड च्या माध्यमातून कायमस्वरूपी उपाय करा - आमदार किशोर जोरगेवार.🔔पीएम श्री शहीद भगतसिंग प्राथमिक तथा उच्च प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव.🔔मोठी स्वप्ने पाहा; ज्ञान, जिद्द आणि कर्तृत्वाच्या बळावर महाराष्ट्राचा गौरव वाढवा! – आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔मोरवा येथील चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमावर कठोरात कठोर कारवाई करा!🔔छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही, तर स्वाभिमान, राष्ट्रभक्ती आणि रयतेच्या कल्याणाचा सर्वोच्च विचार- आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.🔔लोकशाहीच्या रक्षणासाठी लढलेल्या लोकतंत्र सेनानींचा त्याग नव्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे : आ. सुधीर मुनगंटीवार.