The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

आवश्यक उपायोजना करुन वाहतूक व्यवस्था मजबुत करा - आमदार किशोर जोरगेवार.

News Image

*पोलिस अधिक्षकांची भेट घेत सुचना* शहरामध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वाहतूक कोंडी, विस्कळीत ट्राफिक व्यवस्था तसेच सुसाट वेगाने दुचाकी चालविणार्या युवकांमुळे निर्माण होत असलेल्या धोकादायक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आमदार किशोर जोरगेवार यांनी पोलिस अधिक्षक आयुष नोपानी यांची भेट घेत विविध महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहतूक व्यवस्थेत तातडीने सुधारणा करणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे. आमदार किशोर जोरगेवार यांनी शहरातील ट्राफिक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी १०० अतिरिक्त होमगार्डची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी केली. तसेच ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या महत्त्वाच्या चौकांमध्ये ट्राफिक सिग्नल बसविण्यात यावेत, अशा सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या. रात्रीच्या वेळी होणारे अपघात कमी करण्यासाठी ट्रान्सपोर्टच्या वाहनांवर रिफ्लेक्टर लावणे बंधनकारक करण्यात यावे, वाहतूक व्यवस्थेचा नियमित आढावा घेण्यासाठी ‘दिशा समिती’च्या नियमित बैठका घेण्यात याव्यात तसेच ट्रान्सपोर्ट धारकांची स्वतंत्र बैठक आयोजित करून त्यांच्या अडचणी व जबाबदार्यांबाबत चर्चा करण्यात यावी, अशी सूचना त्यांनी यावेळी पोलिस अधिक्षकांना केली. वाहन चालक मद्यप्राशन करून वाहन चालवत आहेत का, याची तपासणी करण्यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी अल्कोहोल तपासणी यंत्र बसविण्यात यावीत. तसेच ट्रान्सपोर्टमधील वाहन चालकांचीही रोज कर्तव्यावर येताना व जाताना अल्कोहोल तपासणी करण्यात यावी, असे निर्देशही आमदार किशोर जोरगेवार यांनी दिले. याशिवाय रस्त्याच्या कडेला उभे राहणार्या वाहनांवर कठोर कारवाई करावी, रस्त्यांवर योग्य दिशादर्शक फलक व सेफ्टी पट्टे करण्यात यावेत, अशा सूचनाही त्यांनी प्रशासनाला केल्या. खासगी बसेसच्या व्यवस्थेबाबतही त्यांनी महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले. खासगी बसेससाठी नागपूर रोड व मूल रोड येथे स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्यात यावी तसेच खासगी बसेसचे अनावश्यक थांबे कमी करण्यात यावेत, जेणेकरून शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले. तसेच सुसाट वेगाने दुचाकी चालविणार्या वाहन चालकांविरोधात विशेष मोहीम राबवून कठोर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, वारंवार नियम तोडणार्यांवर कडक कारवाई करावी तसेच शहरातील संवेदनशील भागांमध्ये पोलिसांची गस्त वाढवावी, अश्या सूचना यावेळी त्यांनी केल्या आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहतूक व्यवस्थेमध्ये शिस्त व नियंत्रण निर्माण करणे अत्यंत आवश्यक असून प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, असेही आ. किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे. यावेळी वाहतुक शाखेचे पोलिस निरिक्षक प्रविण कुमार पाठील, भारतीय जनता पार्टीचे बलराम डोडाणी आदिंची उपस्थिती होती.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
ब्रेकिंग न्यूज़
🔔आमदर सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूरला शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयाची मंजुरी.🔔चंद्रपूरच्या वाहतूक कोंडीवर रिंगरोड च्या माध्यमातून कायमस्वरूपी उपाय करा - आमदार किशोर जोरगेवार.🔔पीएम श्री शहीद भगतसिंग प्राथमिक तथा उच्च प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव.🔔मोठी स्वप्ने पाहा; ज्ञान, जिद्द आणि कर्तृत्वाच्या बळावर महाराष्ट्राचा गौरव वाढवा! – आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔मोरवा येथील चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमावर कठोरात कठोर कारवाई करा!🔔छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही, तर स्वाभिमान, राष्ट्रभक्ती आणि रयतेच्या कल्याणाचा सर्वोच्च विचार- आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.🔔लोकशाहीच्या रक्षणासाठी लढलेल्या लोकतंत्र सेनानींचा त्याग नव्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे : आ. सुधीर मुनगंटीवार.