The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

आमदार किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या विधानाविरोधात चंद्रपूरात तीव्र निषेध आंदोलन.

News Image

चंद्रपूर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी हिंदवी स्वराज्याचे छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतान यांच्याशी केल्याच्या वक्तव्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरच्या वतीने गांधी चौक, चंद्रपूर येथे तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात यावेळी चंद्रपूर शहर महानगर माजी अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, प्रदेश कार्यकारणी निमंत्रीत सदस्य तषार सोम, मनपा गटनेते चंद्रशेखर शेट्टी, रवी गुरुनुले, महामंत्री नामदेव डाहुले, महामंत्री श्याम कनकम, बलराम डोडाणी, विधानसभा अध्यक्ष वंदना हातगावकर, दशरथसिंह ठाकूर, मंडळ अध्यक्ष स्वप्निल डुकरे, दिनकर सोमलकर, नगर सेविका शितल गुरुनुले, ज्याती जिवने, सरला कुळसंगे, अॅड सारिका संदुरकर, आशा देशमूख, मनपा नगर सेवक भालचंद्र दानव, नितेश गवळी, जितेश कुळमेथे, महिला महामंत्री सायली येरणे, घुग्घुस नगर सेवक आशिष मासिरकर, उमेश आयलु, प्रज्ञा बोरगमवार, मंजुश्री कासनगोट्टूवार, प्रविण गिलबिले, शशिकांत मस्के, चंद्रशेखर देशमूख, करणसिंह बैस, दिपक पाठक, अभिनव कोरकोपुलवार, अंकुश मडावी, अनिष दिक्षित, देवा कुंटा, आशु फुलझेले, रेश्मा पांडे, तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. घोषणाबाजी करत सकपाळ यांच्या विधानाचा तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी “छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान आहेत. त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून स्वाभिमान, धर्मरक्षण आणि रयतेचे लोकाभिमुख राज्य उभे केले. अशा युगपुरुषाची तुलना परकीय आक्रमक प्रवृत्तीच्या शासकाशी करणे, ही महाराष्ट्राच्या अस्मितेवर आघात करणारी आणि इतिहासाचा अवमान करणारी बाब आहे. महाराष्ट्रातील जनतेला हा अपमान कदापि मान्य नाही असे ते यावेळी म्हणाले.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
ब्रेकिंग न्यूज़
🔔आमदर सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूरला शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयाची मंजुरी.🔔चंद्रपूरच्या वाहतूक कोंडीवर रिंगरोड च्या माध्यमातून कायमस्वरूपी उपाय करा - आमदार किशोर जोरगेवार.🔔पीएम श्री शहीद भगतसिंग प्राथमिक तथा उच्च प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव.🔔मोठी स्वप्ने पाहा; ज्ञान, जिद्द आणि कर्तृत्वाच्या बळावर महाराष्ट्राचा गौरव वाढवा! – आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔मोरवा येथील चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमावर कठोरात कठोर कारवाई करा!🔔छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही, तर स्वाभिमान, राष्ट्रभक्ती आणि रयतेच्या कल्याणाचा सर्वोच्च विचार- आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.🔔लोकशाहीच्या रक्षणासाठी लढलेल्या लोकतंत्र सेनानींचा त्याग नव्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे : आ. सुधीर मुनगंटीवार.