The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे पोंभुर्णा ग्रामीण रुग्णालयातील पाणीटंचाईवर तोडगा.

News Image
लॉईड मेटल घुग्घुसतर्फे पोंभुर्णा ग्रामीण रुग्णालयातील विहीर व पंपासाठी ११.५२ लाखांचा निधी.
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे रुग्णांना मिळणार दिलासा.
 
 
राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे पोंभुर्णा येथील ग्रामीण रुग्णालयात निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यात आला आहे. लॉईड मेटल घुग्घुसच्या माध्यमातून विहीर बांधकाम आणि पंप बसविण्यासाठी ११ लाख ५२ हजार ३८८ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आमदार श्री. मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, त्यामुळे रुग्णालयातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसाठी पिण्याच्या पाण्याची तसेच दैनंदिन वापरासाठी पाण्याची उपलब्धता अत्यंत महत्त्वाची असते. मात्र पोंभुर्णा ग्रामीण रुग्णालयात पाण्याच्या अपुऱ्या सुविधांमुळे रुग्ण, त्यांच्या नातेवाईकांना तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. रुग्णालयातील दैनंदिन कामकाजावरही याचा परिणाम होत असल्याच्या तक्रारी समोर येत होत्या. ही बाब लक्षात येताच आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने संबंधित विभागांकडे पाठपुरावा करत पाणी टंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून लॉईड मेटल घुग्घुसतर्फे आवश्यक निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून रुग्णालय परिसरात नव्याने विहीर बांधण्यात येणार आहे, त्यावर पंप बसवून पाणीपुरवठ्याची सक्षम व्यवस्था उभारली जाणार आहे. या कामामुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना आवश्यक पाणी उपलब्ध होणार असून, त्यांच्या नातेवाईकांसह वैद्यकीय व प्रशासकीय कर्मचाऱ्यांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी पायाभूत सुविधा मजबूत करणे गरजेचे असल्याचे आमदार मुनगंटीवार यांनी यावेळी नमूद केले. ग्रामीण भागातील रुग्णालये सुसज्ज व्हावीत आणि सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी, यासाठी आपण सातत्याने प्रयत्न केला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.या निर्णयामुळे पोंभुर्णा ग्रामीण रुग्णालयातील पाणीटंचाईचा प्रश्न लवकरच निकाली निघणार असून, स्थानिक नागरिक आणि रुग्णांनी आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
ब्रेकिंग न्यूज़
🔔आमदर सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूरला शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयाची मंजुरी.🔔चंद्रपूरच्या वाहतूक कोंडीवर रिंगरोड च्या माध्यमातून कायमस्वरूपी उपाय करा - आमदार किशोर जोरगेवार.🔔पीएम श्री शहीद भगतसिंग प्राथमिक तथा उच्च प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव.🔔मोठी स्वप्ने पाहा; ज्ञान, जिद्द आणि कर्तृत्वाच्या बळावर महाराष्ट्राचा गौरव वाढवा! – आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔मोरवा येथील चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमावर कठोरात कठोर कारवाई करा!🔔छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही, तर स्वाभिमान, राष्ट्रभक्ती आणि रयतेच्या कल्याणाचा सर्वोच्च विचार- आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.🔔लोकशाहीच्या रक्षणासाठी लढलेल्या लोकतंत्र सेनानींचा त्याग नव्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे : आ. सुधीर मुनगंटीवार.