The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

चंद्रपूरात ‘शतक’ चित्रपटाचे भव्य उद्घाटन सोहळा संपन्न.

News Image

शेकडो नागरिकांनी पहिला चित्रपट, आमदार किशोर जोरगेवार आणि भारतीय जनता पार्टी चंद्रपूर शहर महानगरचे आयोजन. आमदार किशोर जोरगेवार आणि भारतीय जनता पार्टी चंद्रपूर शहर महानगर च्या वतीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शंभर वर्षांच्या अखंड राष्ट्रसेवेच्या गौरवशाली प्रवासावर आधारित ‘शतक’ या प्रेरणादायी चित्रपटाचे प्रदर्शन राधाकृष्ण टॉकिज येथे सर्वांसाठी विनामूल्य ठेवण्यात आले होते. यावेळी शेकडो नागरिकांनी चित्रपट पाहिला. सर्व प्रथम भारत माता, छत्रपती शिवाजी महाराज, स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशवजी हेडगेवार, परमपूज्य माधवजी गोळवलकर गुरुजी, यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. संघाच्या तेजस्वी वाटचालीचे दर्शन घडविणाऱ्या या चित्रपटाचा भव्य उद्घाटन सोहळा यावेळी पार पडला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १०० वर्षांच्या राष्ट्रभक्ती, संस्कार आणि समर्पणाच्या कार्याचा आढावा या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. संघाच्या विचारधारेचा, सामाजिक कार्याचा आणि देशहिताच्या विविध उपक्रमांचा प्रेरणादायी प्रवास या माध्यमातून प्रेक्षकांनी अनुभवता आला. राष्ट्रीय अभिमान, संस्कार आणि सेवाभाव यांचा संगम असलेल्या या चित्रपटामुळे नव्या पिढीला प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
×
ब्रेकिंग न्यूज़
🔔आठ वर्षा पासून फरार पाहिजे असलेला आरोपी स्था.गु.शा. चंद्रपूर च्या ताब्यात.🔔आमदार किशोर जोरगेवार सपत्नीक पालखी सोहळ्यात सहभागी; एकविरा माता मंदिरातून निघालेल्या पालखीने श्री माता महाकाली  महोत्सवाचा शुभारंभ.🔔संविधान वाचविण्यासाठी काँग्रेसला बळ द्या : सिरिवेल्ला प्रसाद.🔔विद्यार्थ्यांची आवेदनपत्र भरण्याच्या वेळापत्रकाला मुदतवाढ.🔔22 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान राज्यभरात ‘खेत बचाओ अभियान’.🔔दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांना सर्वोच्च प्राधान्य द्या. जिल्हाधिका-यांच्या यंत्रणांना सुचना.🔔अभिजित वंजारी यांच्या विजयासाठी काँग्रेस एकवटली!🔔जिल्ह्यातील 50 ग्रामपंचायतींमध्ये ‘स्वस्तिक पद्धतीने वृक्ष लागवड’ मोहिमेचा शुभारंभ.