The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

साकार होत असलेल्या अश्वारूढ महाराजांच्या पुतळ्यामुळे शहराच्या सांस्कृतिक अस्मितेला नवी दिशा मिळेल – आमदार किशोर जोरगेवार.

News Image

शिवजयंती निमित्त महाराजांच्या पुतळ्याच्या प्रतिकृतीवर पुष्पावर्षाव.

 हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, शौर्य, पराक्रम आणि स्वाभिमानाचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याची प्रतिकृती आज येथे ठेवण्यात आली आहे. ही आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. साकार होत असलेल्या अश्वारूढ महाराजांच्या पुतळ्यामुळे शहराच्या सांस्कृतिक अस्मितेला नवी दिशा मिळेल, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. शिवजयंती निमित्त श्री. छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभारण्यात येणाऱ्या पुतळ्याची प्रतिकृती शिवप्रेमींसाठी दर्शनार्थ ठेवण्यात आली होती. या निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, भारतीय जनता पक्षाचे माजी महानगराध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, ओबीसी नेते अशोक जीवतोडे, मनपा गटनेते चंद्रशेखर शेट्टी, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहिर, भाजप नेते प्रकाश देवतळे, तुषार सोम, विधानसभा अध्यक्ष वंदना हातगावकर, महामंत्री रवी गुरनुले, मंडळ अध्यक्ष प्रदीप किरमे, स्वप्निल डुकरे, सायली येरणे, विमलताई कातकर, प्रलय म्हसाखेत्री, रामकुमार आकापल्लीवार, दिनकर सोमलकर, नगरसेविका सारिका संदुरकर, पुष्पा उराडे, शीतल गुरनुले, जितेश कुळमेथे, नितेश गवळे, आशा देशमुख, रॉबिन विश्वास, ज्योती जीवने, आशिष मासीरकर, गणेश पिंपळकर, कौसर खान, सुधीर कारंगल, सुजाता कापसे, अस्मिता तावडे, कल्पना शिंदे, सुमित बेले, चंद्रशेखर देशमुख, राजेश मोरपाका, राकेश नाकाडे, ईश्वर विरुटकर, तपोश डे, शशिकांत मस्के, अभिनय कोरकोपलवार, अलका मेश्राम, हेमलता खोब्रागडे, रीना साखरकर, सोनाली आंबेकर, रेशमा पांडे, रेणुका येरणे, भाग्यश्री येरणे, छाया चवरे आदींची उपस्थिती होती.  

 यावेळी बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, या चौकात उभारला जाणारा महाराजांचा अश्वारूढ पुतळा तब्बल १२ फूट उंच असणार आहे, तर त्यामागील भव्य किल्ल्याची उंची २७ फूट असेल. हा पुतळा केवळ एक शिल्प नसून तो आपल्या इतिहासाची, परंपरेची आणि अस्मितेची सजीव ओळख ठरेल. चंद्रपूर शहराच्या मध्यभागी उभा राहणारे हे स्मारक पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देणारा दीपस्तंभ ठरेल. हा भव्य पुतळा कला संस्कार आर्ट स्टुडीओ, पुणे येथे अत्यंत कुशल शिल्पकारांकडून साकारल्या जात आहे. प्रत्येक बारकावा आणि रेखीव तपशील महाराजांच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वाला साजेसा असेल, याची विशेष काळजी घेतली जात आहे. आज शिवजयंती निमित्त मी या प्रतिकृतीवर पुष्पावर्षाव करून महाराजांना विनम्र अभिवादन केले. मात्र हे केवळ अभिवादन नसून त्यांच्या विचारांचा आणि स्वराज्याच्या तत्त्वांचा आपल्या जीवनात अंगीकार करण्याचा संकल्प आहे. महाराजांनी दिलेला स्वाभिमान, न्याय, सुशासन आणि लोककल्याणाचा आदर्श आपण आचरणात आणणे हीच खरी मानवंदना ठरेल. चंद्रपूर शहराच्या विकासासोबतच सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचे जतन करणे हीदेखील आपली जबाबदारी आहे. हा पुतळा शहराची ओळख ठरेल, पर्यटनाला चालना देईल आणि तरुण पिढीला इतिहासाशी जोडून ठेवेल, असेही ते म्हणाले. यावेळी स्वरा संदुरकर यांनी शिवगर्जना सादर केली, तर धनश्री ईटनकर आणि ऋत्विक साखरकर या चिमुकल्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ मातोश्री यांची वेशभूषा परिधान केली होती. कार्यक्रमाच्या शेवटी आमदार किशोर जोरगेवार यांनी श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
ब्रेकिंग न्यूज़
🔔आमदर सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूरला शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयाची मंजुरी.🔔चंद्रपूरच्या वाहतूक कोंडीवर रिंगरोड च्या माध्यमातून कायमस्वरूपी उपाय करा - आमदार किशोर जोरगेवार.🔔पीएम श्री शहीद भगतसिंग प्राथमिक तथा उच्च प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव.🔔मोठी स्वप्ने पाहा; ज्ञान, जिद्द आणि कर्तृत्वाच्या बळावर महाराष्ट्राचा गौरव वाढवा! – आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔मोरवा येथील चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमावर कठोरात कठोर कारवाई करा!🔔छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही, तर स्वाभिमान, राष्ट्रभक्ती आणि रयतेच्या कल्याणाचा सर्वोच्च विचार- आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.🔔लोकशाहीच्या रक्षणासाठी लढलेल्या लोकतंत्र सेनानींचा त्याग नव्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे : आ. सुधीर मुनगंटीवार.