The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

लाडक्या बहिणींच्या हक्काला विरोध करणाऱ्या काँग्रेसला मतदारांनी धडा शिकवावा आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन भाजपा महायुतीच्या उमेदवारांना विक्रमी मतांनी निवडून द्या प्रभाग ६, ११ व १२ मध्ये आ. मुनगंटीवार यांची जाहीर सभा, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रति

News Image

चंद्रपूर : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेला काँग्रेसने जाणीवपूर्वक विरोध केला असून, जनतेचा पैसा थेट जनतेच्या खात्यात जात असताना काँग्रेसच्या नेत्यांना पोटदुखी झाली होती. ही योजना बंद पाडण्यासाठी काँग्रेसचे लोक थेट न्यायालयात गेले, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. सावत्र भाऊसुद्धा असे काम करणार नाही, इतकी असंवेदनशील भूमिका काँग्रेसने घेतली आहे. अशा काँग्रेसला योग्य धडा शिकवण्यासाठी नागरिकांनी आपले अमूल्य मत चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत उभे असलेल्या भाजपा महायुतीच्या सर्व उमेदवारांना द्यावे, असे आवाहन राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ६, ११ आणि १२ मधील भाजपा–शिवसेना-आरपीआय (आठवलेगट) महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी इंडस्ट्रियल एरिया, कन्नमवार चौक, भानापेठ वार्ड येथे आयोजित जाहीर सभेत भाजपाचे नेते आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी मतदारांना ठाम शब्दांत आवाहन केले. केंद्रात, राज्यात भाजपाचे सरकार आहे. आणि आता चंद्रपूर महानगरपालिकेतही महायुतीचे सरकार असणे चंद्रपूर शहराच्या विकासासाठी अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी या सभेत प्रभाग क्रमांक ११ मधील भाजपा, शिवसेना आणि आरपीआय (आठवले गट ) महायुतीचे अधिकृत उमेदवार सुरज पेदूलवार, आशा अबोजवार, संजय कंचर्लावार, माला पेंदाम व प्रभाग क्रमांक १२ चे महायुतीचे उमेदवार प्रज्वलंत कडू, पुष्पा दहागावकर, राजेंद्र शास्त्रकार, अवीता लडके आणि प्रभाग क्रमांक ६ मधील महायुतीचे अधिकृत उमेदवार सुनीता जैस्वाल, महेश झिटे, राजलक्ष्मी कारंगल व चंद्रशेखर शेट्टी हे १२ ही उमेदवार केवळ नगरसेवक म्हणून नव्हे तर प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणारे लोकप्रतिनिधी ठरतील. लहानपणापासून या परिसराशी माझी नाळ जोडलेली आहे. हे उमेदवार जनतेच्या विश्वासावर खरे उतरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. १२ ही उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन करत आ. मुनगंटीवार यांनी सांगितले की, महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करणे हीच खरी जबाबदारी आहे. चंद्रपूर शहरासाठी मेडिकल कॉलेज, कॅन्सर हॉस्पिटल, रामसेतू, बाबा आमटे अभ्यासिका, इंजिनिअरिंग कॉलेज, वन अकादमी, बॉटनिकल गार्डन, सैनिक शाळा, रस्ते, पिण्याचे पाणी, जिल्हा परिषद इमारत, GST भवन, १० हजार घरे व ऑटोचालकांसाठी अल्पदरातील घरांचा निर्णय यासारखी महत्त्वाची कामे एकसंध सरकारमुळेच मार्गी लागल्याचे त्यांनी नमूद केले. आ. मुनगंटीवार म्हणाले की, राज्य व केंद्र सरकारकडून निधी आणण्याची जबाबदारी आमची आहे. मालमत्ता कर किंवा अन्य कर वाढवून विकास करणे हा आमचा मार्ग नाही. समाजकल्याण विभागाचा निधी असो किंवा गोरगरिबांसाठीचा कार्यक्रम, एक रुपयाही कमी पडू दिला जाणार नाही.काँग्रेसवर टीका करताना त्यांनी काँग्रेसचे राजकारण हे विकासाऐवजी जातीपातीवर आधारित असल्याचा आरोप केला. अनेक वर्षे सत्ता असूनही काँग्रेसने गरिबांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचे सांगत त्यांनी लाडकी बहीण योजनेचा उल्लेख केला. रक्षाबंधनापासून भाऊबीजेपर्यंत लाखो बहिणींच्या खात्यात थेट पंधराशे रुपये जमा झाले असून हा निर्णय महायुती सरकारने घेतल्याचे त्यांनी सांगितले. चंद्रपूर शहरासाठी पुढील काळात दहा हजार घरांचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबवण्याचा संकल्प असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी ठाम शब्दांत आवाहन केले की, चंद्रपूर महानगरपालिकेतही महायुतीचे सरकार आणण्यासाठी, भाजपा महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी मतदारांनी खंबीरपणे उभे राहावे

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
ब्रेकिंग न्यूज़
🔔आमदर सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूरला शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयाची मंजुरी.🔔चंद्रपूरच्या वाहतूक कोंडीवर रिंगरोड च्या माध्यमातून कायमस्वरूपी उपाय करा - आमदार किशोर जोरगेवार.🔔पीएम श्री शहीद भगतसिंग प्राथमिक तथा उच्च प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव.🔔मोठी स्वप्ने पाहा; ज्ञान, जिद्द आणि कर्तृत्वाच्या बळावर महाराष्ट्राचा गौरव वाढवा! – आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔मोरवा येथील चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमावर कठोरात कठोर कारवाई करा!🔔छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही, तर स्वाभिमान, राष्ट्रभक्ती आणि रयतेच्या कल्याणाचा सर्वोच्च विचार- आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.🔔लोकशाहीच्या रक्षणासाठी लढलेल्या लोकतंत्र सेनानींचा त्याग नव्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे : आ. सुधीर मुनगंटीवार.